वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

यशोदा म्हणे हे राजभग

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089845 · अभंग क्र. ३७

37.
यशोदा म्हणे हे राजभगिनी।
का पा आलिसे थांबोनी।
जाईल बाळका झडपोनी।
कैसे करु हे राक्षसी ॥१॥
बहुत उपचारेंसी पूजिली।
पूतना सन्माने बैसविली।
मग ते म्हणे ये यशोदे भली।
पुत्रवंती झालिसी ॥२॥
आणि नाही सांगोनिया धाडिले।
ऐसे निष्ठुरपण त्वा धरीले।
श्रवणी ऐकताचि धावोनिया आले।
आनंदले ह्रदयात ॥३॥
आणिली विचित्र बाळलेणी।
बाळंतविडाही तुजलागुनी।
आणीगे तान्हुले पाहो दे नयनी।
ऐकोनी यशोदा मनी गजबजिली ॥४॥
म्हणे कैसे तरी करु ईसी।
राजभगिनी हे राक्षसी।
दिठाविल माझिया सुकुमारासी।
दिठीचि कठीण इयेचि ॥५॥
मग म्हणे आताचि न्हाणिले।
बाळक पालखी निजविले।
हे ऐकताचि नवल केले।
बाळक उठले न राहेचि ॥६॥
निळा म्हणे पूतना तेथे।
रोषे बोले यशोदेते।
काय गे नष्टपण हे तूते।
मिथ्याचि झकविशी मजलागी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग