भवभ्रम निरसी रे बापा
506.
भवभ्रम निरसी रे बापा ।
भवभ्रम निरसी रे॥धृ॥
काय करू इतरे ।
बहु ज्ञाने । चित्त भयातुर रे बापा ॥१॥
सिद्धि अनेका । नना परिच्या ।
येथे ते न सरे बापा ।
शास्त्र प्रसिद्धा कामिक बुद्धि ।
येणे काय तरे रे बापा ॥२॥
पाचही मुद्रा । लाविती नेत्री ।
भाळ विलोकिति रे बापा ।
दशनादी प्राण गोवुनी राहति ।
तेथे चित्त विरे रे बापा ॥३॥
बहेणि म्हणे तुज । सद्गुरू वरदा-।
विण ते दुर्जय रे ते सुख साधुनि ।
घे नरदेही । पुढील धाव पुरे रे बापा ॥४॥
