वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

अरे चित्ता चिंतन तेच

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076117 · अभंग क्र. ५०७

507.
अरे चित्ता चिंतन तेचि कीजे ।
व्यास पराशर चिंतुनि गेले ते हृदयी स्मरिजे॥धृ॥
भृंगीए करी चिंतन आळी । तद्रुप ते रमिजे ।
चिंतुनिया हरी चिन्मय होशिल हेचि मला उमजे ॥१॥
दैत्यसुते हरी चिंतियला तरी रक्षियेला परी जे ।
द्रौपदीचे अती संकट वारूनी काय तुला नुमजे ॥२॥
बहेणि म्हणे किती सांगो मना तुज हित ते मनी धरिजे ।
चिंतन-भक्ती वरिष्ठची आहे सांग बरे समजे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग