वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

हागता ही खोडी । चळण

🙏 3. संत तुकाराम · ABH-078254 · अभंग क्र. २११८

2118.
हागता ही खोडी । चळण मोडविते काडी ॥१॥
ऐसे अनावर गुण । आवरावे काय म्हून ॥धृपद॥
नाही जरी संग । तरी बडबडविती रंग ॥२॥
तुका म्हणे देवा । तुमची न घडे चि सेवा ॥३॥

अर्थ :
काही मनुष्यांना शौचाला गेले तरीही शांत बसवत नाही काहीतरी चाळा ती करतच असतात, एखादी काडी हातात घेऊन ते उगीच मोडत बसतात. असे अनेक प्रकारचे दुर्गुण अनेक मनुष्याच्या अंगी आहेत ते किती म्हणून आवरावेत? एखाद्या मनुष्याबरोबर कोणीही जरी नसले तरी तो त्याच्याच रंगांमध्ये रंगतो आणि स्वतःशी बडबड करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा बसल्या जागी तुमचे नामस्मरण केले तरी एक प्रकारची सेवाच आहे परंतु असे दुर्गुण असल्यामुळे तुमची सेवा घडतच नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग