वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

तळमळी चित्त दर्शनाची

🙏 3. संत तुकाराम · ABH-078196 · अभंग क्र. २११७

2117.
तळमळी चित्त दर्शनाची आशा । बहु जगदीशा करुणा केली ॥१॥
वचनी च संत पावले स्वरूप । माझे नेदी पाप योगा येऊ ॥धृपद॥
वेठीऐसा करी भक्तीवेवसाय । न पवे चि जीव समाधान ॥२॥
तुका म्हणे कई देसील विसावा । पांडुरंगे धावा घेते मन ॥३॥

अर्थ :
हे जगदीशा तुझ्या दर्शनाची आशा माझ्या चित्ता मध्ये खूप आहे त्यामुळेच मी एवढ्या तळमळीने तुला करूणा भाकली आहे. देवा संतांनी करूना वचन तुला भाकली आणि त्यामुळेच ते तुझ्या स्वरूपाला प्राप्त ही झाले परंतु माझे पापच असे आहे की ते तुझ्या स्वरूपाच्या दर्शनाच्या आड येत आहेत. ते तुझ्या स्वरूपाचा दर्शनाचा योग येऊ देत नाहीत. एखादा मजूर जसा फक्त दिवस काढावा त्याप्रमाणे काम करत असतो त्याप्रमाणेच माझी भक्ती चालू आहे आणि या कारणाने माझ्या जीवाला समाधान प्राप्त होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा माझे मन सतत तुझ्याकडे धाव घेत आहे तरी तू याला कधी विश्रांती, शांतता, विसावा देशील?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग