अनुतापे विरक्त होईल
121.
अनुतापे विरक्त होईल मानस ।
विषयाचा ध्यास तुटेल तै ॥१॥
वाटेल जै चित्ता नावडती जन्म ।
इंद्रियासी नेम होय तेव्हा ॥२॥
स्वर्ग संसाराची तुटेल आवडी ।
होय देशोधडी काम-क्रोध ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे होय जै अंतर ।
तैच होय वर सद्गुरूचा ॥४॥
