मृत्युभया न बिहे रे
120.
मृत्युभया न बिहे रे ज्ञानी मृत्युभया न बिहे ।
सिंधुवरी जसे बुद्बुद येती वाते वाते त्या विलय ॥१॥
मायिक सर्व प्रपंचचि मिथ्या कैचा त्या प्रलय ।
स्वप्न जसे प्रतिभासत मिथ्या देह तदन्वय हे ॥२॥
घृत जैसे थिजले विघुरे मग तेचि पुन्हा घट ये रे ।
हेमाचे नग आटुनि हेमचि काय तयासी भये रे ॥३॥
बहेणि म्हणे निज अनुभव ज्यासी, द्वैतहि तेथ न ये ।
देह पडो अथवा न पडो परि ।
अनुभव ब्रह्मिच त्यासि लयो ॥४॥
