इहलोक सत्य मानिताचि
122.
इहलोक सत्य मानिताचि जाण ।
आली नागवण घरा आधी ॥१॥
निश्चय विवेक करूनी निर्धार ।
शाश्वत हे सार घेई मूढा ॥२॥
इहलोक पाहता क्षणातुनि नासे ।
येथील हव्यास धरू नये ॥३॥
बहेणि म्हणे देह प्रपंच असत्य ।
मनातील तथ्य सांगितले ॥४॥
122.
इहलोक सत्य मानिताचि जाण ।
आली नागवण घरा आधी ॥१॥
निश्चय विवेक करूनी निर्धार ।
शाश्वत हे सार घेई मूढा ॥२॥
इहलोक पाहता क्षणातुनि नासे ।
येथील हव्यास धरू नये ॥३॥
बहेणि म्हणे देह प्रपंच असत्य ।
मनातील तथ्य सांगितले ॥४॥