तुमचीया बळे तुम्हासव
278.
तुमचीया बळे तुम्हासवे खेळावे ।
आपल्या नाडावे मतिवादे धावता ॥१॥
याचिसाठी क्षणक्षणा विनंति करी ।
ठेवावे मजवरी अवलोकन कृपेचे ॥२॥
तुम्हासी न भजता योगयाग सायास ।
तैचि भवपाश होती फळे देऊनी ॥३॥
निळा म्हणे जप तप ध्यान संपत्ति ।
कृपेविण तुमचे होती बंधना मूळ ॥४॥
