वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

घरदार ओखटे त्यजू म्ह

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074851 · अभंग क्र. १९४

194.
घरदार ओखटे त्यजू म्हणसी तरी शरीरा येवढे जाड ।
मायबाप वोखट त्यजू म्हणसी तरी अहंकार अविद्येचे कोड ।
बंधु सखे त्यज्यू म्हणसी काम क्रोध मद मत्सर अवघड ।
बहिणी पाठीच्या त्यजू म्हणसी आशा तृष्णा मायाचे बंड रया ।
त्यजिले ते काय कासया म्हणिजे सांग पा मजपाशी ऐसे ।
जया भेणे तु जासी वनांतरा ते तव तुजचि सरिसे रया ।
स्त्री वोखटी त्यजु म्हणसी तरी कल्पने येवढी भोक्ती ।
पुत्र अपत्य त्यजू म्हणसी इंद्रियांसी नाही निवृत्ति ।
सकळ गणगोत त्यजू म्हणसी तरीहे अष्टधा प्रकृति ।
अवघेचि त्यजू पाहे म्हणसी तरी मना नाही निजशांती रया ।
अवघींची तुज जवळी दुमदुमित असता वरीवरी मुंडिसी का करिसी विटंबना ।
सहज संतोषे असोनि जैसा तैसा परी तो सद् गुरु पाविजे खुणा ।
आपुले आश्रमी स्वधर्मी असता सर्वत्र एकुचि जाणा ।
बापरखुमादेविवरू विठ्ठलु इतकिया साठी नेईल वैकुंठभुवना ॥

अर्थ :
घरदाराचा त्याग करुन जर वनात जायचे झाले तरी शरिराचे जड ओझे तुला वाहावे लागेल. मायबाप वाईट म्हणुन टाकु गेलास तरी अहंकार व अविद्येचे कोड तुला आहे. बहिंण भाऊ त्यागले तरी काम क्रोध मद मत्सर टाकणे अवघड आहे. पाठची बहिण सोडायची म्हंटली तर आशा तृष्णा व माया बंंड करतात. येवढा सारा पकिवार टाकलास तो काय हे मला सांग. व ज्याला भिऊन तु वनात जात आहेस ते तर तुझ्या सतत सोबत आहेत. बायको टाकलीस तरी कल्पनारुपी बायको तुझ्या सतत जवळ आहे. पुत्र, अपत्य टाकु गेलास तर ती इंद्रिय पासुन तुला निवृत्ती नाही. सगळे गणगोत टाकलेस तरी अष्टमा प्रकृती सोबत आहेत. व सर्वच सोडु पाहिलेस तर मनांत शांती नाही. मग येवढे सगळे बरोबर असताना वरवर दंडण मुंडण का करतोस? तु जसा आहेस तसा रहा ही सद् गुरुनी सांगितलेली खुण आहे. तु ज्या वर्णाश्रमात आहेस, जो तुझा स्वधर्म आहे त्या प्रमाणे त्यांच्याशी एकरुप होऊन रहा. तु फक्त येवढेच केसेस तर माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल तुला वैकुंठात नेतील असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग