प्रपंचाचे जगदाळ दुस्
195.
प्रपंचाचे जगदाळ दुस्तर करूनि केऊता जासी ।
जे जे त्यागिले ते ते तुजमाजी ।
त्यागिले ते काय सांगु आम्हांसी ।
तुझे तुजचिमाजी प्रपंचेसि तू सर्वांमाजी वर्तसी ।
ऐसे जाणोनिया का विटंबिसी बापा ।
टाकूनि केऊता जासी रया ॥
मनेंसि विचारी निर्धारूनी योग करी ।
तुझे तुजमाजी अरे विचारी आता बापा ।
अरिमित्रसम होऊनि मन हे शुद्ध होय तेचि तू होऊनि राहे जाण बापा ॥
बाह्य त्यागिसी तरी तो त्यागुचि नव्हे पालटिसी तरी ते विटंबना ।
धरिसी तरीचि तो बंधु मोक्ष मागता हे जडपणा ।
तरी गेलिया जड तो मोक्षचि नव्हे साचा चुकलासी उगाणा ।
वृत्तिशून्याकारे अवलोकिता तव तेणे नव्हे तुज वस्तुज्ञा़ान ।
ऐसे जाणूनि की सिणगी रे बापा ।
हेचि धरूनी राहे निजखुणा रया ॥
म्हणोनि आत इतुके करी ।
साच ते हे धरी तुझे मन होय तुज अधिकारी ।
हे सर्वही त्याग तुज फळती बापा ।
जै एकचि होऊनि निर्धारी नलगे शिणणे दंडगे येणे
आश्रमभावे ऐसेचि ने निधारी ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु चिंतिता सर्व प्रपंचाची जाली बोहरी ।
निवृत्ति राये खुणा दाउनी सकळा ।
निज निजाचे निज निर्धारी रखा ॥
अर्थ :
प्रपंचाचे अवडंबर करुन त्यातुन तरणे दुस्तर आहे. ते त्यागुन तु कोठे जाणार? जे जे टाकायला जाशिल ते तुझ्या मनात सोबत आहे. मग तु कसला त्याग करणार ते आम्हाला सांग? जे तुला टाकायचे आहे त्यात तु वासनारुपाने आहेस. असे जाणुन ही तु स्वतःची विटंबना का करतोस? हे टाकुन तु कोठे जाणार? आपल्याला काय साध्य करायचे ह्याचा योग्य विचार मनात करअरिमित्रा (विजिगीषु) प्रमाणे मन शुध्द करुन घे. हे तु जाण. बाह्य त्याग हा त्याग नसुन ती विटंबना आहे. पण वासनारुप बंध मनात असताना मोक्ष कसा कसा मागता येईल? तरी तो मोक्ष मागायला गेलास तर तो संन्यास किंवा मोक्ष नसुन रिकामा शीण होईल. वृत्तीशुन्य करुन परमात्मवस्तुचे ज्ञान मिळवले हे प्रयत्नपुर्वक कर हीच तुझी निजखुण समज. मग आता इतकेच कर जे सत्य आहे तेच मनात धर त्यामुळे तु आधिकार प्राप्त होशिल. त्यामुळे हे सर्व त्याग तुला फळ देतील उगाच दंडण मुंडण करुन शिणण्याचा उपयोग नाही. हाच आश्रमभाव हे जाण. माझे पिता व ऱखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे चिंतन करता प्रपंचाची बोहरी होते. हीच खुण निजाचे निजतत्व निजरुपी दाखवुन निवृत्तीनाथांनी दाखवली असे माऊली सांगतात.
