आणिक दुसरे मज नाही आ
11.
आणिक दुसरे मज नाही आता । नेमिले या चित्तापासुनिया ॥१॥
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी । जागृती स्वप्नी पांडुरंग ॥२॥
पडिले वळण इंद्रिया सकळा । भाव तो निराळा नाही दुजा ॥३॥
तुका म्हणे नेत्री केली ओळखण । तटस्थ ते ध्यान विटेवरी ॥४॥
