वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 86. सुदर्शन नावाच्या विद्याधाराची सर्प योनीतून मुक्तता

निद्रिस्थ सकळ तये वन

🙏 4. संत नामदेव · ABH-083189 · अभंग क्र. १७३

173.
निद्रिस्थ सकळ तये वनी व्याळ । गिळितसे बळे नंदालागी ॥१॥
कृष्णा धांव वेगी मज गिळी सर्प । काळावरी दर्प तुझा देवा ॥२॥
माझिया पाडसा येईंरे धांवोन । दाखवी वदन अंतकाळी ॥३॥
आली काय तुज निद्रारे कान्हया । माझिया तान्हया ऊठ वेगी ॥४॥
ऐकोनिया ऐसे बोलती सकळ । घालिती मुसळ सर्पावरी ॥५॥
श्रमले सकळ सोडिना नंदाला । पिटी वक्ष-स्थळा नंदपत्नी ॥६॥
उठे जगद्‍गुरु काय झाले माय । लवितसे पाय तयालागी ॥७॥
टाकियेले तेव्हा सर्पे कलेवर । पुरुष सुंदर दिसतसे ॥८॥
नामा ह्मणे वाचे स्तवी विश्वंभरा । करूनि नम-स्कारा जाता झाला ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग