वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

देऊनिया अभयदान । संत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086099 · अभंग क्र. १७५३

1753.
देऊनिया अभयदान । संतीं केले मज पावन । निरसोनी भवबंधन । तारिले मज ॥१॥
ऐसा संतसमागम । नाही आणीक विश्रामक । योगीयांचें धाम कुंठीत पै झाले ॥२॥
आणीक एक वर्म । मुख्य इंद्रियांचा धर्म । मन ठेवुनी विश्राम । नामचिंतन करावे ॥३॥
एका जनार्दनी जाण । संत आमुचे निजधान । काया वाच मन । दृढ पायी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग