माझ्या मनाचा संदेह ।
1754.
माझ्या मनाचा संदेह । फिटला देखतांचि पाय ॥१॥
तुम्ही कृपा केली संतीं । निरसली भय खंती ॥२॥
माझे मज दिले हाती । जाहली समाधान वृत्ती ॥३॥
एका जनार्दनी शरण । निरसला भवशील ॥४॥