वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

शिकवणे नाक झाडी । पु

🙏 3. संत तुकाराम · ABH-080821 · अभंग क्र. ३२४६

3246.
शिकवणे नाक झाडी । पुढील जोडी कळेना ॥१॥
निरयगांवी भोग देता । तेथे सत्ता आणिकाची ॥धृपद॥
अवगुणाचा साठा करी । तेचि धरी जीवासी ॥२॥
तुका म्हणे जडबुद्धी । कर्मशुद्धी सांडवी ॥३॥

अर्थ :
एखादया मनुष्याला जर आपण चांगले शिकवण्याचा प्रयत्न केला तर तो त्याला पटत नाही तो आपला तिरस्कार करतो व आपल्यापुढे नाक झाडून आपण सांगितलेला चांगला उपदेश तो ऐकत नाही परंतू अशा त्याच्या वागण्याने पुढे त्याला नरकाची प्राप्ती होईल हे त्याला कळत नाही. मग पुढे त्याला नरकप्राप्ती होते व तेथे त्याला अनेक प्रकारचे दु:ख भोगावे लागतात व यमदूताची व यमाची सत्ता त्याच्यावर चालते. अनेक दुर्गुणाचा साठा तो आपल्या ह्दयामध्ये करुन ठेवत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे असे जड बुध्दीचे लोक असतात की त्यांच्या अंत:करणातील जे दुर्गुण असतात त्या दुर्गुणामुळे ते शुध्द कर्म देखील टाकण्यास प्रवृत्त होतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग