वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

न मिळती एका एक । जये

🙏 3. संत तुकाराम · ABH-080809 · अभंग क्र. ३२४५

3245.
न मिळती एका एक । जये नगरीचे लोक ॥१॥
भली तेथे राहू नये । क्षणे होईल न कळे काय ॥धृपद॥
न करिता अन्याय । बळे करी अपाय ॥२॥
नाही पुराणाची प्रीति । ठायींठायी पंचाइती ॥३॥
भल्या बुऱ्या मारी । होता कोणी न विचारी ॥४॥
अविचाऱ्या हाती । देऊनि प्रजा नागविती ॥५॥
तुका म्हणे दरी । सुखे सेवावी ते बरी ॥६॥

अर्थ :
ज्या नगरीचे लोक एकमेकांच्या मताने एकत्र येऊन मिसळत नाहीत, मग भल्या माणसाने तेथे राहूच नये एक क्षणात तेथे कोण काय करेल व काय होईल हे सांगताच येणार नाही. अहो एखादा सभ्य मनुष्य जर तेथे गेला भला मनुष्य जर तेथे गेलाच तर त्या गावातील लोक त्याने काहीही अन्याय न करता बळेच त्याचे काहीतरी नुकसान करतील. अहो त्या गावामध्ये हरीकथा पुराणे याविषयी आवड तर नसतेच परंतू भांडण मिटवण्यासाठी जागोजागी पंचायत चालू असते. वाईट प्रवृत्तीचे माणसांचे आणि चांगल्या प्रवृत्तीच्या माणसांचे जर भांडण चालू असले आणि वाईट माणसे चांगल्या माणसांना मारीत असले तर तेथे कोणीही यामध्ये खरे अपराधी कोण आहेत याचा विचार करतच नाहीत. एखादया अविचारी माणसाच्या हातात तेथील प्रतिष्ठित लोक आपल्या राज्याची सत्ता देऊन टाकतात आणि आपल्या राज्यातील प्रजाजनांचे हाल त्रास करवून घेऊन त्यांना नागवितात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा एक विचार नसलेल्या मनुष्यांच्या गावात राहण्यापेक्षा सुखाने डोंगर दऱ्यात राहणे हे चांगले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग