मुक्तचि शरीर दग्धपट
433.
मुक्तचि शरीर दग्धपट जैसा ।
उरला तो तैसा देह-संगे ॥१॥
ऐसे साधुसंत वोळखावे कैसे ।
अखंडित पिसे नामी जाले ॥२॥
जनाहिसारखे वर्तती वेवहारी ।
असोनी संसारी देहातीत ॥३॥
बहेणि म्हणे नामी अखंडित लीन ।
देह हे भूषण कधी नेणे ॥४॥
433.
मुक्तचि शरीर दग्धपट जैसा ।
उरला तो तैसा देह-संगे ॥१॥
ऐसे साधुसंत वोळखावे कैसे ।
अखंडित पिसे नामी जाले ॥२॥
जनाहिसारखे वर्तती वेवहारी ।
असोनी संसारी देहातीत ॥३॥
बहेणि म्हणे नामी अखंडित लीन ।
देह हे भूषण कधी नेणे ॥४॥