वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

ठेविन मी मस्तक त्याच

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075970 · अभंग क्र. ४३२

432.
ठेविन मी मस्तक त्याचे चरणी ।
लाविल मज स्मरणी ।
ध्याइन मी निश्चळ अंतःकरणी ।
निज दाविल नयनी ॥१॥
आता सद्गुरू स्वामी आणा ।
माझिया प्राणा॥धृ॥
ज्याचे दर्शने द्वैत निरसे ।
माया न स्पर्शे ।
अमृतवृष्टि ज्यावरी वर्षे ।
आनंदे हर्षे ॥२॥
खंती वाटती त्याची मज गे ।
किती सांगू मी तुज गे ।
सांगेल मुक्तिचे निजबीज गे ।
बहेणि म्हणे मग गे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग