विश्वी विश्वंभर पाहे
434.
विश्वी विश्वंभर पाहे ज्ञानद्टेटी ।
घेऊनी कसोटी वेदशास्त्रे ॥१॥
काय उणे मग आपुल्या स्वमुखा ।
होऊनिया मुका राहे तेथे ॥२॥
पुष्पामाजी वास नेणती ते नेत्र ।
घ्राणेविण श्रोत्र व्यर्थ सर्व ॥३॥
बहेणि म्हणे देवे व्यापियेले जग ।
ज्ञानदृष्टि चांग पाहिजे ते ॥४॥
