संत निळोबारायांच्या
168.
संत निळोबारायांच्या गौळणी
एकी येकटेंचि असोनि एकला ।
विश्वी विश्वाकार होऊनिया ठेला ।
जया परीवो तैसाचि गमला ।
नंदनंदन हा आचोल अंबुला वो ॥१॥
ऐशा गौळणी त्या बोलति परस्परी ।
करुनि विस्मय आपुलाल्या अंतरी ।
विश्वलाघवीया हाचि चराचरी ।
नेणो महिमा यांसी म्हणो व्यभिचारी वो ॥२॥
गिरी गोवर्धन येणे उचलिला ।
काळिया महासर्प नाथुनि आणिला ।
जळत वणवा वो मुखेचि प्राशीला ।
गिळिता आघासुर चिरुनी सांडिला वो ॥३॥
कपटया माभळभटा दिल्हे पिडेदान ।
शोषिली पूतना विषे पिाजिताचि स्तन ।
उखळी बांधता उपटिले विमळार्जून ।
भक्षूनि मृतिका वदनी दाविली भुवने वो ॥४॥
आणिखी एक येणे नवलावो केला ।
काला वांटिता वो विधाता ठकिला ॥
भाग नेदिता तो वत्से गोवळ घेऊनि गेला ।
तैसिच आपण येथे होऊनिया ठेला वो ॥५॥
इंद्र चंद्र महेंद्र यातेचि पूजीती ।
श्रुति शास्त्रे तेही यातेचि स्तविती ।
महासिध्द मुनि ध्यानी आराधीती ।
निळा म्हणे तो हा जोडला सांगाती वो ॥६॥
