वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ५. विरहिणी

होते लेउनिया आतीचे अ

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089781 · अभंग क्र. २१५

215.
होते लेउनिया आतीचे अंजन ।
तेणे देखिले वो निक्षेपीचे धन ।
होते वेदराये ठेविले जोडून ।
तेचि सांपडले आईते निधान वो ॥१॥
जनी जनार्दन प्रत्यक्षचि होता ।
तोचि मुसावोनि कृष्ण झाला आता ।
मंडित चतुर्भज वेणुवाजविता ।
मुकुट कुंडले वो माळाचा मिरवता वो ॥२॥
प्रगट असोनिया न दिसेचि कोणा ।
आड आलिया वो बुध्दीची कल्पना ।
जाय हरपोनी अविदयेच्या भावना ।
तेणेचि न देखती भूती भगवाना वो ॥३॥
कैसा मायामोह भ्रम झाला गाढा ।
तेणे जाणीवची धावे पुढा पुढा ।
विधिनिषेधाचा माझारी झगडा ।
तेणे अंतरला न सापडे मूढा वो ॥४॥
इंद्रिया विषयाची सदा लगबग ।
मातले अहंकार काम क्रोध मांग ।
मदमत्सराचे धावती निलाग ।
तेणे हातींच्या हाती अंतरला श्रीरंग वो ॥५॥
ऐसे चुकवुनी आघात अपार ।
आजी सांपडले आईते भांडार ।
तेणे झालिये वो निजसुखे निर्भर ।
निळा म्हणे भोगुं सुखाचे संभार वो ॥६॥
जलचर भूचर खेचर वनचरे ।
लुब्ध होऊनिया वेणेचिया स्वरे ।
राहिली तटस्थचि मानसे शरीरे ।
नेणती वैरभाव एकत्र परस्परे वो ॥४॥
पवन निश्चलचि होऊनिया ठेला ।
सूर्य अस्तमाना जाऊ विसरला ।
वत्से न पिती देहभाव गेला ।
मुखीचा कवळ गाईमुखींचि राहिला वो ॥५॥
ऐसा स्वानंदाचा आला महापुर ।
कृष्णवेणुध्वनी लोधले अंतर ।
नेत्री गळताती प्रेमाचे पाझार ।
निळा म्हणे देही देहा अनाचार वो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग