वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ४. गौळणी

ऐकी एकपणाचा घेउनिया

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089809 · अभंग क्र. १६९

169.
ऐकी एकपणाचा घेउनिया त्रास ।
जाला नानाकार स्वरुपे बहुवस ।
म्हणोनि दुसरेंचि नाढळे वोयास ।
जयाततयामाजी याचाचि रहिवास वो ॥१॥
ऐसे निजात्मया जाणोनि गोविंदा ।
जीवे भावे अनुसरल्या प्रमदा ।
करिती सेवावृत्ति निशिदिनी सदा ।
हसती रुसती करिती विनोदा वो ॥२॥
सर्वसाक्षी सर्वही जाणता ।
सर्व करुनिया म्हणावे अकर्ता ।
जीवी जिवाचा हा आप्तचि सर्वथा ।
जेथे तेथे याची नित्य एकात्मता वो ॥३॥
नित्य अंगसंगे भोग त्यासि देति ।
दृष्टी अवलोकूनि गुण त्याचे गाती ।
नेऊनि एकांति वो निजगुज बोलती ।
करिती कामधाम परी त्याचिपासी वृत्ति वो ॥४॥
सासु सासुरिया भ्रतारासी चोरी ।
नणंदा जावा त्याही त्यजूनिया घरी ।
देती आलिंगन निजात्मया हरी ।
येथुनि म्हणती संसारा बोहरी वो ॥५॥
ऐशा निळा म्हणे झाल्या हरिरता ।
त्या त्या विराजती मुक्तिचिया माथा ।
नानासाधनांच्या लाजउनि चळथा ।
जाल्या असोनि संसारि नित्यमुक्ता वो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग