नाद पडे कानी । मृग प
233.
नाद पडे कानी । मृग पैज घाली प्राणी ॥1॥
आवडी अंतरी । गज मेला पडे गारी ॥2॥
चोख पाहे अंग । दिपे नाडला पतंग ॥3॥
गोडी रसगळा । मच्छ अडकला गळा ॥4॥
गंधे आंले नेला । म्हणे जनी तोचि मेला ॥5॥
233.
नाद पडे कानी । मृग पैज घाली प्राणी ॥1॥
आवडी अंतरी । गज मेला पडे गारी ॥2॥
चोख पाहे अंग । दिपे नाडला पतंग ॥3॥
गोडी रसगळा । मच्छ अडकला गळा ॥4॥
गंधे आंले नेला । म्हणे जनी तोचि मेला ॥5॥