नाम सुलभ इहलोकी । तर
867.
नाम सुलभ इहलोकी । तरले तरले महापातकी ।
म्हणोनि वाचे जो घोकी । नित्य नेमे आदरे ॥१॥
तयाचे तुटतें बंधन । होय जन्माचें खंडन ।
वाचे गाता जनार्दन । सोपे जाण साधन हे ॥२॥
नमन करुनी समाधान । आठवी रामनामाचें ध्यान ।
शरण एका जनार्दनी । समाधान संतोष ॥३॥
