जनार्दने मज सांगितला
866.
जनार्दने मज सांगितला मंत्र । रामनाम पवित्र जप करी ॥१॥
सोडवील राम संसार सांकडीं । न पडेचि बेडी अरिवर्गां ॥२॥
जप तप साधन पुराण श्रवण । नाम घेता जाण सर्व घडती ॥३॥
एका जनार्दनी टाकुनी संशयो । नाम मुखी राहो प्रेमे पोटी ॥४॥