वियोग नाम्याचा न साह
335.
वियोग नाम्याचा न साहे गोपाळा । न जाय राउळा पांडुरंग ॥1॥
पद्माळ्यात तेव्हा राहे विश्वंभर । कळे समाचार रुक्मिणीसी ॥2॥
चलावे मंदिरी स्वामी पुरुषोत्तमा । येईल गे नामा माझा जेव्हा ॥3॥
तयाविण मज दाही दिशा ओस । न लगे चित्तास गोड काही ॥4॥
जनी म्हणे ऐसी आवड नाम्याची । म्हणोनिया त्याची झाले दासी ॥5॥
