आंधळ्याची काठी । अडक
169.
आंधळ्याची काठी । अडकली कवणे बेटी ॥1॥
माझिये हरणी । गुंतलीस कोणे रानी ॥2॥
मुके मी पाडस । चुकले भोवे पाहे वास ॥3॥
तुजवीण काय करु । प्राण किती कंठी धरू ॥4॥
आता जीव जाऊ पाहे । धाव घाली माझे आये ॥5॥
माझी भेटवा जननी । संता विनवी दासी जनी ॥6॥
