अळंकापुरवासिनी समिप
168.
अळंकापुरवासिनी समिप इंद्रायणी । पूर्वेसी वाहिनी प्रवाह तेथे ॥1॥
ज्ञानाबाई आई आर्त तुझे पायी । धावोनिया येई दूडदुडां ॥2॥
बहु कासाविस होतो माझा जीव । कनवाळ्याची कीव येऊ द्यावी ॥3॥
नामयाची जनी म्हणावी आपुली । पायी सांभाळिली मायमापे ॥4॥
