वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

अवघेचि मने दोहीलिया

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074385 · अभंग क्र. ६४८

648.
अवघेचि मने दोहीलिया धेनु ।
प्राणापानी प्राणु निवविला ॥१॥
ते रूप परब्रह्म जाणो प्राण सम ।
करूनिया नेम जपो आम्ही ॥२॥
नेणो धूर्ति मूर्ति कैचि हे प्रवृत्ति ।
कृष्णेचि समाप्ति सर्व करू ॥३॥
निवृत्तीचे तारू कृष्णी कृष्णसुख ।
ज्ञानदेवा चोख दिधले नाम ॥४॥

अर्थ :
आम्ही संसारिक वासना टाकून देऊन शुद्ध मनाने परमात्मरूप धेनूचे दोहन केले. आणि जीवाला धारण करणारे प्राणापानादिक हे सर्व परमात्मरूप करून जीवाला नित्य शांत केले. ते कृष्णरूप परब्रह्म यथार्थ जाणून व त्याच्याबरोबर प्राणापानाचे ऐक्य करून त्याचे नामजपाचा आम्ही निर्धार केला. हे आता त्या जपाशिवाय इतर सर्व साधनांची प्रवृत्ति श्रीकृष्ण परमात्मस्वरुपाचेच ठिकाणी समर्पण करू. श्रीगूरू निवृत्तिरायांनी परमात्मा श्रीकृष्णाचे ठिकाणी असणारे जे कृष्णरूप सुख तद्रूप नाम हेंच कोणी एक तारू माझे हाती दिले आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग