वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

निर्गुणाची छाया सगुण

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074382 · अभंग क्र. ६४९

649.
निर्गुणाची छाया सगुणी बिंबली ।
तत्त्वी तत्त्वे गेली अनुठाया ॥१॥
निश्चळी निश्चळ नलगे अळुमाळ ।
तत्त्वता अढळ ते वेगळेचि ॥२॥
नातळता पंथी शब्दाचा सुहावा ।
परेसहित दोहावा भरला दिसे ॥३॥
ज्ञानदेवी रम्य दिसोनी न दिसे ।
निराकारी भासे तदाकार ॥४॥

अर्थ :
निर्गुण स्वरूपाचे प्रतिबिंब सगुणांत आहे. ते सगुणातील प्रतिबिंब श्रीगुरूकृपेने निर्गुण तत्त्वांत एकरूप होते. त्यावेळी ते निश्चल तत्त्वांत निश्चळ असलेले दिसले तरी त्याला अळुमाळ यत्किचीतही संबंध लागत नाही. चल किंवा निश्चल याहून तो परमात्मा तत्त्वतः वेगळा असून अढळ आहे. शब्दाच्या सहाय्याने जे वेदवाक्याच्या सहाय्याने त्याचा पत्ता लागत नाही. परावाणीसहित तो जात व्याप्त आहे. माझे ठिकाणी ते अपरोक्षत्वाने असून दृश्यत्वाने दिसत नाही. परंतु निराकाररूपाने त्याचे अंतःकरणांत सहजच भान होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग