गोपाळपुरीं काला गोपा
417.
गोपाळपुरीं काला गोपाळ करिती । तेथील लाभा देव लाळ घोटिती ॥१॥
ऐसा आनंद गे माय तया पंढरपुरी । धन्य भक्त देवांचे वारकरी ॥२॥
आषाढी कार्तिकी नित्य नेमे जाण । जाउनी भीवरे करिताती स्नान ॥३॥
घेता दरुशन पुंडलिकाचे भेटी । एका जनार्दनी पुण्य न समाये सृष्टी ॥४॥
