वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 275. वैदू ३९७८

वैदू ३९७८

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087541 · अभंग क्र. ३९७८

3978.
वैदू ३९७८

मच्छाई यो शंकासूर मारुनी चाही । वेद लाईये । ब्रह्मासी सुख केलीये । तुझ्या रूपाचीथोरी काय वर्णं ये । बुरगुंडाये माये बुरगुंडाये ॥१॥ ।कच्छाई वो समुद्रमंथन केलीये । पाठन देउन महा । मेरू तारियेले । दैत्यासी मारिलीये । देवासी रक्षिलीये । ऐसी तुझी थोरवी जग वाखाणिये । तुझे स्वरूपाचीऐकून बहु सुख पाविलिये । माये बुरगुंडाये ॥२॥ वहाई वो पृथ्वी बुडिये । ते दाढे धरीये । विश्वजनासीतारिये । तुझे स्वरूपासी ब्रह्म वाखाणिये । न कळेतया सीमाई वो ॥३॥ नरसीमीयो प्रल्हादाकारणें । वैंकुठीहुनी प्रल्हाद रक्षिलीयो । तारिले भवभक्ततारिले प्रल्हादासी । हिरण्यकश्यपाकारणें आईयो ॥४॥ बळीराम दैत्य पृथ्वी माजलियो । त्या कारणेकैसी धावलीसे वामनरूप धरूनियो । तीन पाऊलपृथ्वी दान मागितलीयो । तिसरे पाउलीये बळीघालोनी पाताळीयो । तयाचे द्वारी द्वारपाळ होउनीराहिलीयो । भक्तिकारणे देणे तुझी थोरी झालीयो । आईयो बुरगुंडे ॥५॥ परशरामाईयो । पित्याचे वचनाधांवलीयो । रेणूकें मातेचे शीर उडविलीयो । पहातिचे नवल केवळ थोरीयो । पित्याचे वचनें चौघेउठविलीयो । भक्तिभाव देखोनी निक्षेत्री पृथ्वीकेलीयो ॥६॥ रामाईयो सीतेकारणे रामे रावण । वधिलीयो । देवगणा सोडून सुखी केलीयो । धन्य । तुझी एक वृत्ती सकळ धर्म तारीयो ॥७॥ कृष्णाबाईयो । देवकी बंदीशाळे त्याकारणें धांवलीयो । धरून । कृष्णलीला कंसमामासी मारलीयो । भक्ति कुबजेचीदेखोनी तिसी भावे उद्धरलीयो ॥८॥ बोधाईयोभक्तिभाव देखुनी तिष्ठत भीमातिरीयो । पुंडलिका-कारणे सकळ जग उद्धरीलीयो ॥९॥ कलंकीअवतार धरुनी सकळ पृथ्वी बुडविलीयो । वटपत्री राहिलीयो । एका जनार्दनी देखिलीयो । आई वैदीण प्रसन्न झालीयो । सकळ सुखदेखिलीयो ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग