मुंगी उमगा मुंगी उमग
2120.
मुंगी उमगा मुंगी उमगा | मुंगीचे मुखी त्रिवेणी गंगा ॥१॥
उदकाचे टवळे मसीची माती | अंधारी मुंगीने तेथे लाविली ज्योती ॥२॥
अवघे आकाश मृंगीये मागे | मुंगीये संसार सांडिला मार्गे ॥३॥
विष्णुदास नामा मुंगीये मागे | मुंगी उमगली खेचरसंगे ॥४॥
