वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 213. कूट

एका ब्राह्मणाचे घरीं

🙏 4. संत नामदेव · ABH-082180 · अभंग क्र. २११९

2119.
एका ब्राह्मणाचे घरीं. खाण पडिले | साता चोरी एक मुसळ नेले |पुडे ब्राह्मण नागविले | धाऊणे आले बोसगांबीचे ॥१॥
वोसगांवींचा हनुमंत खोटा | त्याचा बाप जुनाट चोरटा |मारूनि 'नेतो दाही वाटा | जना चोहटा' नागविले ॥२॥
नागविला चोहांटीचा वाणी | आणिक नेली प्रभूची गोणी |शेळी आली लांडगा घेऊनि | गाढव बंदीखानी बोंबलत ॥३॥
एका संन्याशाने कुतरे खादले | गांवच्या खाटका प्रायश्चित्त दिले |बापुडे कुंभार नागविले | डोचके फोडिले म्हातारीचे ॥४॥
ऐशा 'सिद्धांतीच्या खुणा | एक जाणे पंढरीराणा |विष्णुदास नामा करी विज्ञापना | संत प्रेमळ जाणती ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग