वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

ध्यानाची धारणा उन्मन

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090146 · अभंग क्र. १५४

154.
ध्यानाची धारणा उन्मनीचे बीज । लक्षिता सहज नये हाता ॥१॥
ते हे कृष्णनाम सखे नंदघरी । गौळिया माझारी ब्रह्म खेळे ॥२॥
न दिसे पाहता शेषादिका गति । यशोदे श्रीपति बाळ झाला ॥३॥
गुंतले मायाजाळी अनंत रचने । तो चतुरानना खुणे न संपडे ॥४॥
नकळे हा निर्धारू तो देवकी वो देवी । शेखी तो अनुभवी भुलविला ॥५॥
निवृत्ति रचना कृष्णनामे सार । नंदाचे बिढार ब्रह्म झाले ॥६॥

अर्थ:
ध्यानाची धारणा व योग्यांच्या उन्मनी अवस्थेचे बीज जरी त्यांचे लक्ष असले तरी ते त्यांना सहज सापडत नाही.तेच परब्रह्म कृष्णनाम धारण करुन गौळ्यांबरोबर खेळत आहे. ज्यांची गती व त्याचे स्वरुप त्याच्या जवळ असणारे शेषादिक जाणु शकले नाहीत तोच यशोदेचा बाळ श्रीपती झाला आहे. ज्याने मायाधीन होऊन ह्या विश्वाची निर्मीती केली त्या ब्रह्मदेवाला हे त्याचे स्वरुप सापडले नाही. कारागृहात व बाहेर अनेक चमत्कार दाखवुन ही त्याचे स्वरुप देवकी व वसुदेवाला समजले नाही ते त्याला पाहुनच भुलले. निवृतीनाथ म्हणतात त्याच्यामुळे त्या नंदाचा सर्व परिवारच ब्रह्मरुप झाला त्या कृष्णनामाला मी सार म्हणुन वाङमयात रचले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग