वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

चतुरानन घन अनंत उपजत

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090013 · अभंग क्र. १५५

155.
चतुरानन घन अनंत उपजती । देवो देवी किती तयामाजि ॥१॥
तेंचि हे सांवळे अंकुरले ब्रह्म । गोपसंगे सम वर्ते रया ॥२॥
निगमा नाठवे वेदाचा द्योतुकु । तो चतुर्भुज देखु नंदाघरी ॥३॥
निवृत्ती म्हणे शंखचक्रांकितमूर्ति । आपण श्रीपति क्रीडतसे ॥४॥

अर्थ:
त्याच्या स्वरुपात कित्येक देव देवता नव्हे नव्हे ब्रह्मदेव ही उपजतो. तेच ब्रह्मस्वरुप सावळे सुंदर रुप घेऊन त्या गोपाळांबरोबर समानतेची वर्तणुक करताना दिसते. तेच परब्रह्म वेदांचे द्योतक असुन ही वेदांने ते समजत नाही. तोच चतुर्भुज परमात्मा नंदाचा कृष्ण झाला आहे. निवृतिनाथ म्हणतात, शंखचक्रांकित असलेला लक्ष्मीचा मालक गोकुळात नवनविन क्रिडा करतो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग