हा पुरुष की नारी नव्
153.
हा पुरुष की नारी नव्हे तो रूपस । शेखी जगदीश जगद्रूप ॥१॥
ते हे कृष्णरूप यशोदेकडीये । नंदाघरी होये बाळरूप ॥२॥
ज्याते नेणे वेद नेणती त्या श्रुती । त्या गोपिका भोगिती कामरूपे ॥३॥
निवृत्तिचे ब्रह्म कृष्णनामे खेळे । असंख्य गोवळे ब्रह्मरूप ॥४॥
अर्थ:
त्या अरुप परमात्माला पुरूष किंवा स्त्री कसे म्हणता येईल तोच ह्या जगाचा जगदिश बनुन आला आहे. त्याच कृष्णरुपात तो नंदाच्या घरी बाळ होऊन यशोदेच्या कडेवर बसला आहे. ज्याला ओळखायला वेद व श्रुती कमी पडतात त्याचा वावर त्या गोपिका नित्य भोगतात. निवृतिनाथ म्हणतात, माझे बपरब्रह्म कृष्णनाम घेऊन त्या गोपाळांबरोबर खेळता खेळता त्यांना ब्रह्मरुप प्रदान करते.
