देवलोकी इंद्र सेवेसी
568.
देवलोकी इंद्र सेवेसी सादर | भूतसेन चाकर होता तेथे ॥१॥
सेवेसी चुकता होय तू किरात | ऐसे इंवे त्याते शापियेले ॥२॥
शेज सज्ज करिता अंतर पडिले| म्हणोनि घडले भोग त्यासी ॥३॥
नामा म्हणे सेवा करणे हे कठीण | त्याने व्हावे जाण सावधान ॥४॥
