होऊनि हरण राहिला तो
567.
होऊनि हरण राहिला तो वनीं| दोषी त्या हरिणी स्त्रिया जाल्या ॥१॥
जातीच्या स्वभावे करिती विहार| चित्त जाले स्थिर एकमेका ॥२॥
धाकुटीला दोन्ही पाडसे गोजिरीं| दुजी गरोदरी पूर्ण मास ॥३॥
नामा म्हणे पुढे काय जाली गती| कथेची संगति ऐका बरी ॥४॥
