ऐकतांचि शब्द होऊनि क
569.
ऐकतांचि शब्द होऊनि किरात | राहिला निवांत एके ग्रामी ॥१॥
पाळणपोषण विषयांची वोढी | करितसे जोडी पातकांची ॥२॥
चण्डभिल्ल नाम घेतले ठेऊनि | दुष्टभाव मनी वाढविला ॥३॥
कासेसी वाघुरा हाती शूळ दंड| सामोग्री उदंड मेळविली ॥४॥
हिंडे नाना वन पर्वत शिखरे | मारीतसे फार जीवजंतू ॥५॥
जातीचा स्वभाव लागला तयासी | कष्टे अहर्निशी म्हणे नामा ॥६॥
