संकल्पापासोनी हिरोनी
700.
संकल्पापासोनी हिरोनी घेतले ।
मन हारपले विकारेसी ॥१॥
सुख ते सांगता सुखदुःख पळे ।
कोनाचिया बळे बोल बोलो ॥२॥
इंद्रियांची श्रांति पावली हा बोल ।
बोलता नवल ऐसे झाले ॥३॥
बहिणी म्हणे भेटी अक्षराची चित्ता ।
होताचि पूर्णता हारपली ॥४॥
