तूप असे क्षीराआत ।
701.
तूप असे क्षीराआत ।
साकर उसाच्या रसात ॥१॥
परी पाहिजे हो ज्ञन ।
वस्तुप्राप्तीचे कारण ॥२॥
सोनयाचे होती नग ।
पट सूताचे अनेक ॥३॥
अहो काष्टामाजी अग्नी ।
तिळामाजी तेल जाण ॥४॥
बहिणी म्हणे देही देव ।
ज्ञानेविण सर्व वाव ॥५॥
701.
तूप असे क्षीराआत ।
साकर उसाच्या रसात ॥१॥
परी पाहिजे हो ज्ञन ।
वस्तुप्राप्तीचे कारण ॥२॥
सोनयाचे होती नग ।
पट सूताचे अनेक ॥३॥
अहो काष्टामाजी अग्नी ।
तिळामाजी तेल जाण ॥४॥
बहिणी म्हणे देही देव ।
ज्ञानेविण सर्व वाव ॥५॥