रांड तेचि खरी मुखी न
699.
रांड तेचि खरी मुखी नाही हरी ।
ते जाणावी निर्धारी जन्मरांड ॥१॥
जया पुरूषाचिये मुखी नाही हरी ।
जाणावा ता खर जन्मा आला ॥२॥
टिळे टोपी माळा नराचा आकार ।
जाळावा विचार ज्ञानेविण ॥३॥
बहिणी म्हणे जया नाही आत्मज्ञान ।
जाणावे ते श्वान जन्मा आले ॥४॥
