वैकुंठा जावया न लगे
756.
वैकुंठा जावया न लगे ते सायास । रामनामे पाश दृढ तुटती ॥१॥
तारिले वानर वनचरे रामे । गोपिका त्या कामे मुक्त केल्या ॥२॥
गोपाळ सवंगडे नामेंचि तारिले । जडजीव उद्धरिले कलियुगीं ॥३॥
एका जनार्दनी सांगांवें ते किती । रामनामे मती न लगे याची ॥४॥
