राम राम म्हणता वाचे
757.
राम राम म्हणता वाचे । रामरुप होय साचे ॥१॥
रामे तारिली शबरी । नित्य राम ती उच्चारी ॥२॥
रामे तारिली गणिका । केल्या अजामेळ सखा ॥३॥
शिळा तारिल्या सागरी । राम अहिल्या उद्धरी ॥४॥
एका जनार्दनी । राम भरला जनीं वनी ॥५॥