वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

जिणे देउनी देही निःश

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074846 · अभंग क्र. २९५

295.
जिणे देउनी देही निःशंक होईजे ।
मा मरणे मरण तयासी म्हणिजे ॥१॥
जिणे ते काई मरणे ते काई ।
जिणे मरणे दोन्ही चोजवेना ॥२॥
सिंधु बुडबुडा क्षणामाजी आटे ।
सिंधु बुडबुडा काही ते नाटे ॥३॥
बापरखुमादेविवराच्या पायी ।
ज्ञानदेवो पाही मरण जाणे ॥४॥

अर्थ :
देह असतांनाच देहाच्या ठिकाणचा जीवभाव टाकून देऊन आपण परमात्मरूपच आहोत. असा निःसंदेह बोध होणे यालाच परमार्थ दृष्टीने मरण म्हणतात. परमार्थ दृष्टीने जन्म किंवा मरण हे मुळीच नाहीत. समुद्रावर भासणारा बुडबुडा एका क्षणामध्ये समुद्ररूप होतो. मग तो समुद्ररूप झालेला बुडबुडा केंव्हाही नाहीसा होत नाही. तद्वत जीव ब्रह्मरूप झाल्यानंतर तो अजरामर होतो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याच्या चरणाच्या ठिकाणी बुडबुड्याप्रमाणे लय पावणे याचे नाव मरण आहे. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग