वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

सायखडियाचे बिक ।

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074824 · अभंग क्र. २९६

296.
सायखडियाचे बिक ।
अचेत करी परिपाक ।
जनदृष्टीचे कवतुक ।
स्फुरे वेगी ॥१॥
तैसे हे देहरुप जाले च ।
न होतेचि होणे आले ।
तव सद्गुरु जाणितले ।
येथीचे रया ॥२॥
सतधनि म्हणे गुरु ।
जत सांभाळी विवरु ।
ऐसेनि तुज वोगरु ।
वाढीला ब्रह्मी ॥३॥
निराकार अलिप्त वसे ।
शरीरी असतुचि नसे ।
एकतत्त्व मनोद्देशे ।
हृदयी ध्याये ॥४॥
सोडी रसाची सोये ।
नको भुलो मायामोहे ।
सत्रावी दोहतु जाये ।
जीवन भाते ॥५॥
ज्ञानदेव म्हणे श्रीगुरु ।
ऐसा सांगती विचारु ।
मग ब्रह्मींचित्तानुसारु निरोपिला सर्व ॥६॥

अर्थ :
ज्याप्रमाणे खेळियाच्या बलाने निर्जीव बाहुल्या नाचू लागल्या बरोबर लोकांच्या दृष्टीच्या ठिकाणी कौतुक उत्पन्न होते. त्याप्रमाणे नसलेला देह मायेने उत्पन्न झाला आहे. हे वर्म श्रीगुरुनी जाणले आहे. परमात्म्याचा मालक जो श्रीगुरु तो असे विवरण करुन परमात्मस्वरुप ज्ञानाचे पक्वान्न करुन तुला वाढीत आहे. ते चांगले जतन कर. परमात्मा निराकार अलिप्त असून शरीरांत असताही दिसत नाही. अशा परमात्म्याशी जीवाचे एकत्व आहे. याचे तू मनाने नेहमी चिंतन करीत जा. आणि विषयरसांची गोडी टाकून दे. या मायामोहाला भुलू नको. योगाभ्यास करुन सत्रावी जी जीवन कला तिच्यातील अमृताचा रस चाखीत जा. अशा तहेचा विचार श्रीगुरु सांगतात. त्यांच्या सांगण्याप्रमाणे ब्रह्म चिंतनाची सवय चित्ताला लागली की. सर्व गोष्टी आपोआप ब्रह्मरुपच भासू लागतात. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग