वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

दीपके माजी दीपक दीप्

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074868 · अभंग क्र. २९४

294.
दीपके माजी दीपक दीप्तीसरे ।
बिंबोनी सहज बिंबि न मिळे ॥१॥
बिंब नाही पाहासील काई ।
ठायींच्या ठायी होऊनि राही ॥२॥
सर्वीसर्व रस समरसोनी आहे ।
उभारूनी बाहे वेद सांगे ॥३॥
ज्ञानदेव निजी निजोनी सहज ।
देहीचा निर्लज्ज रूसला सये ॥४॥

अर्थ :
जीवाच्या ठिकाणी जो ज्ञानरुपी दिवा आहे. त्या दिव्याचे तेज परमात्मा आहे. त्या परमात्म्याचे तेजाचे प्रतिबिंब जीवांचे ठिकाणी आहे. बिंब व प्रतिबिंब एकच असते. त्याप्रमाणे जीवाचे ब्रह्माशी सहज एकत्व आहे. बिंबरूप परमात्मा नसता तर प्रतिबिंबरूपी जीव तरी कसा दिसला असता ? म्हणून प्रतिबिंबरूप जो तू, बिंबरूप परमात्म्याशी एकरूप आहे. परमात्मा सर्व ठिकाणी एकरूपाने आहे. असे वेद हात वर करून सांगत आहेत. मी माझ्या स्वरूपांच्या ठिकाणी सहजस्थित असल्याने माझ्या ठिकाणचा निर्लज्ज देहअहंकार निघून गेला आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग