वाणी गांधिपण पाठी पस
1747.
वाणी गांधिपण पाठी पसारा घेवोनि संसारा आलो असे ॥१॥
पसारे करी पसारे करी | वाया उभाराउभरी करितसे ॥२॥
रस रसायण आणि भाजीपाला | शकुन आम्हा जाला पुरता आहे ॥३॥
वाटे एक खोटे दांडी चेपी बोट | कवणेपरी न फिटे कुडेपण ॥४॥
बोलतो मे खोटे देतो मे उणे | वायांच शिणे रात्रंदिवस ॥५॥
विष्णुदास नामा विनवी केशवा | तेहिपरी देवा उद्धरावे ॥६॥
